साधारणतः विचारले जाणारे प्रश्न

ऱ्हेमॅटॉलॉजि ही   वैद्यकातील अशि एक शाखा आहे जी   हाडे, स्नायू, सांधे, व स्नायूबंध यांच्या विकृतीसंबंधी आजारांचे निदान आणि उपचार करते.

ऱ्हेमॅटॉलॉजि मध्ये सौम्य स्वरुपाच्या मान, पाठ दुखी पासुन ते तीव्र स्वरुपाच्या संधिवात, अँकोइलोजिंग स्पॉन्डिलायटीस, ल्युपस, वास्कुलिटिस सारख्या मल्टीसिस्टम रोगां चा समावेश होतो.

ऱ्हेमॅटॉलॉजिस्ट हे अस्थि, संधि व स्नायु च्या विकारां वर औषधोपचार करतात तर ऑर्थोपेडिक सर्जन हे अस्थि, संधि, स्नायु च्या विकारां वर शस्त्रक्रिये द्वारे उपचार करतात.

नावाप्रमाणे ऑर्थोपेडिक सर्जन हे फिज़िशन नसून सर्जन आहेत. तुटलेल्या हाडांचे (फ्रॅक्चर) निराकरण करणे किंवा संधि प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे, अस्थिबंधन किंवा कूर्चा दुरुस्ती करणे यासारख्या हाडांवर शस्त्रक्रिया करण्याच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. आपल्याला सांधे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया किंवा सांध्यांच्या तुटलेल्या रचनांची दुरुस्ती आवश्यक असल्यास आपले संधिवात तज्ञ आपल्याला ऑर्थोपेडिक सर्जनकडे पाठवू शकतात. परंतु लक्षात ठेवा संधिवात तज्ञांनी अनेक अनावश्यक संधि  पुनर्स्थापनेच्या शस्त्रक्रिया रोखण्यास आणि शस्त्रक्रिया नसलेले पर्यायि उपचार शोधण्यास मदत केली आहे. जेव्हां तुम्हाला औषधोपचाराची गरज अस्ते जसे कि सांधे दुखी, पाठ दुखी, इत्यादि साठि तुम्हि ऱ्हेमॅटॉलॉजिस्ट (संधिवात तज्ञ) चा सल्ला घ्यायला पाहिजे,  आणि जेव्हां तुम्हाला शस्त्रक्रिये चि गरज अस्ते जसे कि फ्रॅक्चर, संधि प्रत्यारोपण इत्यादि साठि तुम्हि ऑर्थोपेडिक सर्जन यांचा सल्ला घेतला पाहिजे. संधिवात, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटीस,गाऊट या रोगांवर औषधोपचार केले जातात, श्स्त्रक्रिया नाहि म्हणून या रोगां साठि तुम्हि ऱ्हेमॅटॉलॉजिस्ट चा सल्ला घेतला पाहिजे.

ऱ्हेमॅटॉलॉजिस्ट हे अस्थि, संधि व स्नायु च्या विकारां वर औषधोपचार करतात तर ऑर्थोपेडिक सर्जन हे अस्थि, संधि, स्नायु च्या विकारां वर शस्त्रक्रिये द्वारे उपचार करतात.